🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र पोलीस हे सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी टायर असतात. ‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरेल असे काम करण्यास पोलीस कटिबद्ध असतात. मात्र, अनेक वेळा कायदेशीर कारवाई करताना पोलिसांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागत असते. यामुळे पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्यास अडचण निर्माण होत असते. पुढे यामुळेच कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असतो.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस विभागाशी संबंधित एका कार्यक्रमात, ‘माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो. कोणालाही पाठीशी घालू नका’ असे सक्त निर्देशच दिले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेकवेळा टोळक्यांमधील भांडण, वाहने जाळणे, तोडफोड यामुळे सामान्यांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतो. पोलीस या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. ‘पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये,’ असंअजित पवार म्हणाले.
तर, ‘मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो. वाहनांचं जळीतकांड, वाहनांची तोडफोड, व्यापाऱ्यांना गुंडांकडून होणार त्रास, यासह विविध गुन्हे कायमचे बंद करा. कोणाची हयगय करू नका. एकाला ही पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो.’ असं देखील पवारांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत वाद नको म्हणून ठाकरेंनी ‘या’ नेत्याची केली हकालपट्टी
- डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही – रामदास आठवले
- अमेरिकन हिंसाचारात तिरंगा ! शिवसेना खासदार संतापल्या…
- हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत कंगना चौकशीसाठी हजर
- अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल माघारी; टीम इंडियाला सलग दुसरा धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
