मुंबई : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.
सय्यद यांच्या अर्जाची दखल घेऊन कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल केल्या नंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल होते. मात्र, वैयक्तिक कारणास्तव ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती. यानंतर पोलिसांनी तिला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती.
आणि त्यात तिला 23 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं. मात्र, तिसऱ्या नोटिशीला तिने प्रतिसाद दिला नव्हता. उलट तिने हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टाने तिला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज (शुक्रवार) कंगनाला वांद्रे पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी हजर राहवे लागणार होते. पण कंगना आजतरी हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, कंगनाने कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नुकतीच वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे. आता कंगनाची किती तास चौकशी चालणार आहे हे अद्यापही समोर आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
- भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर : संजय राऊत
- डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही – रामदास आठवले
- अमेरिकन हिंसाचारात तिरंगा ! शिवसेना खासदार संतापल्या…
- भाजपला खिंडार : माजी आमदारासह ‘या दिग्गज नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश
- अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल माघारी; टीम इंडियाला सलग दुसरा धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
