🕒 1 min read
सातारा : जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पहिल्यांदाच जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सभासद, संचालकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकत्यार्ंनी त्यांना घेराव घातला. तसेच तुमच्या अशा बोलण्याने कारखाना बंद पडेल, अशी भीती व्यक्त केली.
यावर सोमय्या म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. कारखाना बंद पडण्याची भीती काही लोक दाखवतात, ती चुकीची आहे. हा कारखाना कुणी घेतला याचे उत्तर हिम्मत असेल तर अजित पवार यांनी द्यावे, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.
‘कारखाना बंद पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऊस उत्पादकांसोबतच कारखान्यावर अवलंबून असणारा कामगार, ऊस वाहतूक कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर हा घटक देखील तितकाच महत्त्वाचाच आहे. पण, हे होत असताना काही चुकीचं घडत आहे का? हे देखील तपासण तितकचं महत्त्वाचं आहे.’
कारखान्यावरून कुणीही राजकारण करत नाही. राजकारण होत आहे ते भ्रष्टाचाराचे. कारखाना चांगला चालावा यात दुमत नाही. पण जनतेची लूट करून चालावा हे मंजूर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, असे आश्वासन सोमय्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या सहन केल्या जाणार नाहीत- मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी
- ‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

