🕒 1 min read
मुंबई : अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याचे पुनरावलोकन करण्याच्या सूचनेमध्ये, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून ड्रग वापरकर्ते आणि व्यसनाधीन व्यक्तींसाठी तुरुंग टाळून अधिक मानवी दृष्टिकोन ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. काही दिवसांअगोदर पाठवलेल्या शिफारशीमध्ये मंत्रालयाने वैयक्तिक वापरासाठी कमी प्रमाणात ड्रग्ज सोबत बाळगणं गुन्हेगारीमुक्त करण्याची मागणी केली आहे.
मागील महिन्यात एनडीपीएस कायद्याचा नोडल प्रशासकीय प्राधिकरण असलेल्या महसूल विभागाने गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आणि सीबीआय सोबतच अनेक मंत्रालये आणि विभागांना कायद्यात बदल सुचवण्यास सांगितले होते. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने या संदर्भात महसूल विभागाकडे आपल्या सूचना पाठवल्या आहेत.
दरम्यान,अनेक प्रकरणांमध्ये कलम २७ वापरण्यात आले आहे. उदाहरणार्थ अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ शिपवर ड्रग्जच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. विविध औषधे आणि सायकोट्रॉपिक पदार्थ बाळगल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या प्रकरणांच्या बाबतीत मंत्रालयाने असे सुचवले आहे की कायद्याने थोड्या प्रमाणात’ पकडलेल्यांना तुरुंगवासापासून वगळावे. त्यांच्यासाठी शासकीय केंद्रांमध्ये सक्तीच्या उपचाराच्या शिफारशीही करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
