Share

ODI Ranking : जसप्रीत बुमराहची कमाल! वनडे क्रिकेटमध्ये बनला नंबर वन गोलंदाज

Published On: 

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ओव्हल येथील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील त्याच्या विक्रमी कामगिरीचा फायदा झाला आहे. ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तो जगातील नंबर-१ गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १९ धावांत ६ बळी मिळवले होते. इंग्लंडमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली. गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत त्याने पाच स्थानांनी झेप घेतली आहे. बुमराहच्या खात्यात आता ७१८ गुण आहेत. यानंतर बोल्ट दुसऱ्या स्थानावर आला आहे, तर शाहीन आफ्रिदी तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड चौथ्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल १० गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त एकही भारतीय नाही. त्याच्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलचा टॉप-२० मध्ये समावेश झाला आहे. तो या क्रमवारीत सध्या २० व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी २३ व्या तर भुवनेश्वर कुमार २४ व्या स्थानावर आहे.

याअगोदर बुमराह टी-२० चा नंबर-१ गोलंदाजही राहिला आहे. कसोटी क्रमवारीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारा तो कपिल देव नंतरचा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा हे देखील एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहेत.

भारताने इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी बाजी मारली. त्यानंतर आता भारतीय संघाने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली आहे. ओव्हल येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजाने दमदार कामगिरी केली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ अवघ्या ११० धावांतच गारद झाला. प्रतिउत्तरात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकासह भरताने एकही गडी न गमावता सामना जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!