Share

Shinde Government : ‘या’ तारखेला होणार मंत्रीमंडळ विस्तार? ; राजकीय वर्तुळात हालचाली

Published On: 

मुंबई: शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या सहकार्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाची शपथ घेतली आहे. मात्र अजूनही मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे येत्या १९ जुलैरोजी शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार, अशी माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रिमंडळ विस्तारावर  चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडून मंत्र्यांची लीस्ट तयार असून ती 19 तारखेला जाहीर केली जाण्याची शक्यता  आहे.

दरम्यान 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक असून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू 14 जुलैला मुंबईत येणार आहेत.  त्यानंतर 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!