🕒 1 min read
मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी भेट दिली. आजचा दिवस हा गुरुप्रती ऋण व्यक्त करण्याचा असतो. बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही संधी मिळाली. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना राज्यात पुढे नेण्याचे काम करू. या राज्यात मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली होती. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला ही संधी मिळाली. त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच या सगळ्या घडामोडी शक्य झाल्या. मी आणि माझ्यासोबतचे आमदार बाळासाहेबांच्या विचारांना राज्यात पुढे नेण्याचे काम करतील. मराठी माणसाला बाळासाहेबांनी ताट मानेने जगणे शिकवले होते.’ असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
‘हे सर्वसामान्यांचे सरकार असून समाजातील सर्वच घटकांचा विकास व्हावा हे आमचे ध्येय आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने वाटचाल करत आहोत. त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे.’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आज वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांच्या शक्ती स्थळ या समाधीस्थळी उपस्थित राहून विनम्रतापूर्वक अभिवादन केले. #गुरुपौर्णिमा pic.twitter.com/y7TDd2G3Kq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
दरम्यान,“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन!”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले होते. यासोबतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटो देखील शेअर केला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
