Share

शेतकऱ्यांंसाठी ३५० गुन्हे अंगावर घेवून मी फिरतो – आ.बच्चू कडू

Published On: 

-स्वप्नील भालेराव /पारनेर
निघोज (पारनेर ; नगर) : शेतकऱ्यांसाठी 350 गुन्हे अंगावर घेवून मी फिरतो, शेतकऱ्यांसाठी मी कधीच कशाची फिकीर केली नाही. बच्चू कडू हा जातीमुळे निवडून येत नाही, तर सर्वांसाठी काम करतो म्हणून निवडून येतो. सातव्या वेतन आयोगाला मी एकट्याने विरोध केला, पण पराभवाचा विचार केला नाही. बुद्धी गहाण ठेवून मतदान करू नका, असे भावनिक आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.

निघोज येथे शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या जंगलमोती शेतकरी उत्पादन कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार बच्चू कडू बोलत होते. पारनेर तालुक्यातील युवा नेते निलेश लंके, शेतकरी कंपनीचे मार्गदर्शक शिवाजी लंके, संदीप हळकुंडे तसेच इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.

आमदार कडू पुढे बोलताना म्हणाले,  युवा विद्यार्थी सेनाप्रमुख ते आमदार, हा प्रवास माझ्या शेतकऱ्यामुळे झाला. आयुष्यात गुलामगिरीत जगू नका. राजकीय लोकांइतके सोंगाडे कुठेच पहायला मिळणार नाहीत. राजकारणातील सर्व माणसे पदावर शेतकरी म्हणून गेले, पण हेच लोक बळीराज्याला विसरले. या सरकारने तर शेतकऱ्यांचे आयुष्यच संपून टाकले आहे,असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केले.

कडू म्हणाले,जात, पंथ, धर्म, आपल्या डोक्यात राजकीय लोकांनी घुसवले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला. 16 लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर 55 हजार कोटी रुपये सातवा वेतन आयोगावर खर्च सरकार करणार, पण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निकषांच्या अडथळ्यांची शर्यत सरकार लावत आहे. जनावरापेक्षा जन्मदात्या बापाने जास्त कष्ट केले, पण हातात काय मोल पडले, याच मोठं दुःख आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही, शौचालयाला सरकार अनुदान देते, कारण अनुदानात मोठी गफलत आहे, असा आरोपही कडू यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!