Share

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल

Published On: 

मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल. त्याचा खेळ पाहून लहानाची मोठी झाली आणि वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं नेतृत्वाचं कौशल्य दाखवून दिलं. त्याच्याबद्दल मुलाखतीतून बरंच काही ऐकलं आहे आणि त्याच्यासारखा कर्णधार पाहिला नाही, असं अनेक जणं सांगतात. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली वन डे संघात खेळणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे.” अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रीग्जनं धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेमिमानं धोनीच्या नेतृत्वकौशल्याचं कौतुक केलं आणि त्याचा खेळ पाहून लहानाची मोठी झाल्याचं तिनं सांगितलं.

महेंद्रसिंग धोनी (एम. एस. धोनी) हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी हा आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे. मधल्या फळीचा सक्षम फलंदाज आणि एक सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणूनही धोनीची जगभरात ओळख आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वन डे आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. पण, सध्या धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू असली तरीही विराट कोहलीपेक्षा धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्याची इच्छा भारतीय महिला संघाच्या फलंदाजानं व्यक्त केली आहे.

तसेच, धोनीनं 200 वन डे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 110 सामने जिंकले आहेत. 74 सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला. 200 पेक्षा अधिक वन डे क्रिकेटमध्ये नेतृत्व करणाऱ्या धोनीची विजयी टक्केवारी 59.52 इतकी आहे. या टक्केवारीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ( 76.14) अव्वल आहे, तर धोनी दुसऱ्या स्थानी आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!