टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांसाठीचे महाराष्ट्रातील मतदान नुकतेच संपले आहे. आता जनतेला प्रतीक्षा आहे ती २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालाची. अशातच रायगडमध्ये आपला विजय निश्चित असल्याचं प्रतिपादन अनंत गीते यांनी केले आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात मतदारांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले असून आपला विजय निश्चित आहे. कारण जिल्ह्यातील मतदारांनी माझ्या मागे ठाम राहून मतदान केले आहे. तसेच अदृश्य हातांनेही यावेळी मला मतदान केले आहे. त्यामुळे 23 मेला मतमोजणीचा कल हा माझ्या बाजूनेच लागणार असं विधान त्यांनी मतदार व शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना केले आहे.
दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अनंत गीते यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुनील तटकरे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे रायगडमध्ये रंगतदार लढत होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

