Share

‘महाराष्ट्रातील एक नंबरचे मताधिक्य मला मिळणार’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – आज सकाळपासून मतदारांची मतदान करण्यासाठी लगबग सुरु आहे. संपूर्ण राज्यात २८८ जागांसाठी मतदान होत आहे. अनेक नेते बाहेर पडून मतदान करत आहेत. भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे यांनी कुटुंबासह मतदान केले यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

मतदानानंतर नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी ‘आपण गेल्या पाच वर्षात केलेली कामे आणि भाजपाची साथ यामुळे विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. महाराष्ट्रातील एक नंबरचे मताधिक्य आपल्याला या मतदार संघातून मिळेल’ असं विश्वास नितेश यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सेना भाजपची युती असली तरी कणकवलीमधून नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे राज्यातील भाजपच्या इतर उमेदवारांप्रमाणे नितेश राणे यांना शिवसेनेकडून पाठींबा मिळणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

दरम्यान, आज सकाळपासून अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, उदयनराजे यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1186213081925341184?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1186213012752855046?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1186212650180460545?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!