मुंबई- काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला.मुंबई, बिहार ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी उभ्या राहिलेल्या बाहुल्या, रावणी, काळी टोपी आणि बेडकी अशा सर्वांनाच त्यांनी अक्षरशः सोलून काढले.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ठाकरेंनी नाव न घेता, राणेंना बेडुकाची उपमा दिली. शिवसेनाचा दसरा मेळावा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. पण काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला, त्यांनी बाबांना सांगितलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला.
आम्ही फावड्याचे असे केले हाल,
एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 26, 2020
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर निलेश राणे यांनी ट्विटरवरून पलटवार केला आहे.’आम्ही फावड्याचे असे केले हाल,एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल’,अशा शब्दांत दुसरं ट्विट करत निलेश राणे यांनी उध्दव ठाकरेंसह त्यांच्या दोन सुपुत्रांची खिल्ली उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी,कंगनाचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
- ब्राह्मण समाजाच्या ‘या’ पावरफुल नेत्याने केला रिपब्लिकन पक्षात प्रवेश
- तुम्ही काय‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- न्याय,हक्क मिळविण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारा – रामदास आठवले
- देवेंद्र फडणवीसांच्या नंतर आता अजित पवारांनाही झाला कोरोनाचा संसर्ग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

