Share

… पण मै झुकूंगा नही ; भाजप नेते मोहित कंबोज यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर कोविड जम्बो हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोप केला होता. या आरोपानंतर संजय राऊत यांनी पण किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार केला आहे.

तर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषेद संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मोहित कंबोज यांच्यावर पण काही गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राऊत आणि कंबोज यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेनेचे नेते दोघेही एकमेकांवर टीका , आरोप करत आहेत. संजय राऊत यांनी जेव्हा मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंट मॅन म्हणून  मोहित कंबोज यांचा उल्लेख केला होता. या संजय राऊत यांच्या आरोपानंतर संजय राऊत आणि मोहित कंबोज यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. त्यातच आज मोहित कंबोज यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकार मला अटक करण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप केला आहे. आरोप करतानाच, ” जो करना हैं कर लो , मैं आपसे डरता नहीं हूँ , लोगों से धमकी भेजना बंद करो ! हर हर महादेव ! असे म्हणत ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  मला सध्या खूप फोन येत आहेत . महाराष्ट्र सरकार मला काही करून अटक करू इच्छित आहे. काही करा पण मोहित कंबोज याला अटक करा असा आदेश महाराष्ट्र सरकार कडून देण्यात येत आहे.

परंतु, मी भ्रष्टाचाराविरोधात सदैव लढत राहणार आहे. अन्यायाला वाचा फोडणार आहे. खरं बोलणे हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणारच. मी जेलमध्ये जायला घाबरत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही काहीही करा पण मी झुकणार नाही. ”मैं झुकूँगा नहीं” असे ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!