Share

चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, पण यातून काही निष्पन्न झाले का?

Published On: 

🕒 1 min read

सातारा : भारत आणि चीनमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. कॉंग्रेसनेते खा.राहुल गांधी रोज सरकारवर याच मुद्द्यावरून टीका करत आहेत. यातच आता ‘केंद्र सरकार हे दिशाहीन आणि हातपाय गळालेले सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक मैत्रीवर पररराष्ट्र धोरण ठरत नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे’ असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात साताऱ्यात चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आंदोलन केले यावेळी ते बोलत होते.

वीज बिलाचा आकडा पाहून रेणुका शहाणेला बसला शॉक; ट्विट करत व्यक्त केला संताप

स्वतःच्या शपथ विधीला मोदींनी इतर राष्ट्रांच्या प्रमुखांना बोलावलं, म्हणून आपण मोठं काम करतोय असे होत नाही. भारताच्या इतिहासात चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, पण यातून काही निष्पन्न झाले का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्वीटच्या माध्यमातून मोठे वक्तव्य केले. त्यांचे ट्वीट म्हणजे काँग्रेससाठी घरचा अहेर ठरला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आणि चीनच्या वर्तनावरुन देशात राजकीय चिखलफेक होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. चीनच्या कृत्याचा सर्वांनी एकजुटीने निषेध करणे आवश्यक आहे. एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे, असे देवरा म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अप्रत्यक्षपणे कान काल टोचले होते. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे, असा सल्ला पवार यांनी राहुल यांना दिला आहे. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी भारत-चीन वादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चांगलेच शालजोडीतून लगावले आहेत.

‘राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा त्यांना कुणीही बोललं नाही’

पवार म्हणाले, काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२च्या युद्धानंतर चीनने आपला भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असं सांगतानाच जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!