Share

हे राजकीय षडयंत्र; मी 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार – संजय काकडे

Published On: 

पुणे : युवराज ढमाले याने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांकडून कळवलेले नाही. ढमालेने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मला बोलवून अथवा माझे जबाब न घेता आणि कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी हा गुन्हा दाखल केला आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता? यासह या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जनतेसमोर सर्व सत्य यावे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिले देशमुख, पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना निवेदन देणार आहे. तसेच, या आरोपांमुळे मानहानी झाली असून, संबंधितांवर मानहानी झाल्याचा व 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती माजी खासदार संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यापूर्वी ढमाले याने माझ्यावर केलेल्या आरोपांची मला बोलवून शहानिशा करायला हवी होती. माझा प्रत्यक्ष जबाब नोंदवून घेऊन कायदेशीरपणे गुन्हा नोंदवायला हवा होता. कारण, ढमालेनी तीन वर्षांपूर्वी मी त्याला दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतक्या वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबाबत एखादा व्यक्ती तक्रार देत असेल तर, पोलिसांनी त्याविषयी खात्री करून पुढील कारवाई करणे अपेक्षित होते परंतु, तसे घडले नाही. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविण्यापूर्वी आरोपांची साधी खात्रीदेखील करावीशी वाटली नाही. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून समजली. महाराष्ट्रातील पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु, चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमधील पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कुणाचे फोन आले? कोणी त्यांच्यावर दबाव आणला? याविषयी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी एखादा विशेष तपास अधिकारी नियुक्त करून चौकशी करावी. यामध्ये ढमालेचे तक्रार दाखल केल्याच्या संपूर्ण दोन दिवस अगोदर व पोलीस स्टेशनच्या संबंधीत अधिकाऱ्याचे दोन तास अगोदर व नंतरचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले जावेत, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

राममंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारींना…

वास्तविक 29 ऑगस्ट 2017 आणि 29 ऑगस्ट 2018 या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी युवराज ढमाले पुष्पगुच्छ घेऊन आला असतानाच भेट झालेली आहे. या व्यतिरिक्त आजपर्यंत गेल्या तीन वर्षात त्याच्याबरोबर माझं बोलणंदेखील झालेले नाही. माझी पत्नीदेखील त्याच्याबरोबर एक वर्षापासून बोलत नाही. दहा वर्षांपूर्वी सोपान बागेतील एका प्रकल्पामध्ये युवराज ढमाले भागीदार होते. परंतु, त्यानंतर गेल्या दहा वर्षांत आमचा कोणताही व्यवसाय ढमालेबरोबर भागिदारीमध्ये नाही. त्यामुळे ढमाले याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. यामागे राजकीय षडयंत्र आहे. कोणीतरी ढमालेला पुढे करून अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्याचे काम केले असावे. या गुन्ह्या संदर्भात मी कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांवर 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही माजी खासदार संजय काकडे म्हणाले.

महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, ‘ते’ बिहार निवडणुकांसाठी राजकारण करत आहेत: रोहित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!