Share

राममंदिर भूमीपूजनाचं पहिलं निमंत्रण मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारींना…

Published On: 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जोरात सुरु आहे. यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. यातील पहिलं निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना पाठवण्यात आलं आहे. त्यांना हे आमंत्रण राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांच्यातर्फे पाठवण्यात आलं आहे. इक्बाल अंसारी यांच्यासह मुस्लिम पक्षकार हाजी महबूब यांना देखील निमंत्रण दिलं आहे. तसंच बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाल्यावर अंसारी म्हणाले की, या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालं आहे. याचा फार आनंद आहे. मी या कार्यक्रमात नक्की सहभागी होणार आहे. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने ही जागा रामललाच्या भव्य मंदिरासाठी दिली आहे. आता यासंदर्भात कुठलाही वाद नाही. ते म्हणाले की, मी नेहमी साधुसंतांमध्ये राहिलो आहे. माझ्या मनात प्रभू रामांविषयी आदर आहे. त्यांनी म्हटलंय की, कदाचित भगवान रामांची इच्छा असावी की, मंदिर भूमि पूजनाचं पहिलं निमंत्रण मला मिळावं, मी याचं स्वागत करतो.

शाह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते अडकले कोरोनाच्या विळख्यात;येडियुरप्पा यांनाही कोरोनाची झाली लागण 

अयोध्येमध्ये होणाऱ्या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून झाली. आज सकाळी 9 वाजता गणपती पूजन झालं. उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. ही पूजा जवळपास 5 तास सुरु राहील. यात 6 पुजाऱ्यांचा समावेश असेल. तर 5 ऑगस्टला बुधवारी, शुभमुहुर्तावर राममंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. या पूजेला देखील मर्यादित पुजाऱ्यांचा समावेश असेल.

“शरद पवारांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!