मुंबई : मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या कोठडीत समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी, इथून बाहेर पडल्यानंतर मी गरिब, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास व्यक्तींसाठी काम करण्याचा प्रयत्न करेन, तसेच सर्वांना आपला अभिमान वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनावेळी दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह पथकाने आर्यनचे समुपदेशन केले. तेव्हा त्याने भविष्यात आपले नाव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीझोतात येणार नाही, याची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अटक केली आहे.
दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालय येत्या 20 ऑक्टोबरला आपला निकाल देणार आहे. आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

