🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे महाराष्ट्रातून कुठूनही विधानसभा लढणार असतील, तरी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे असं विधान केले आहे.
आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याचे संकेत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. परंतु त्यांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे जर आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली तर सुरज चव्हाण हेही त्यांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत.
पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला फटका बसला आहे. त्यामुळे पक्षातील नेते हे तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या तयारीत आहेत त्यमुळे चव्हाण यांना पक्षाकडून संधी मिळू शकते. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुरज चव्हाण यांच्यात लढाई झाली तर टी अत्यंत चुरशीची होईल यात काही शंका नाही.
दरम्यान वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते वरळीतून निवडणूक लढवण्याची शक्यता जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178239086034735104?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178212663416868864?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178212298281799680?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
