अहमदनगर:- माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिणची लोकसभेची जागा 2009 साली सोडली असती, तर उत्तरेत माझा पराभव झाला नसता. परंतु आता दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ.सुजय विखे पाटील खासदार झालेत. पण पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून पून्हा येईन, पुन्हा येईन आणि लवकर परत जाणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपण येथून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे संकेत दिले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मनात शिर्डीत ११ वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाची सल कायम आहे. आतापर्यंत ते या पराभवासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच विखे पाटलांनाही जबाबदार धरत होते. आता त्यांची भाषा थोडी बदलली असून विखे यांच्या मदतीनेच या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
सध्या राज्यातील परिस्थिती बदलली आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू डॉ.सुजय विखे पाटील नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे आता मला पुन्हा शिर्डीत येण्यासाठी काहीही अडचण नाही, असे सांगत आठवले यांनी आपली शिर्डीतून निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखविली आहे. अर्थात त्यावेळीही त्यांना विखे यांच्या मदतीनेच खासदार व्हायचे होते आणि आताही विखे यांच्याच मदतीची अपेक्षा ठेवून आहेत. अर्थात यावेळी दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी बदललेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- ‘संजय राऊतांनी कंपाउंडरऐवजी डॉक्टरांकडून औषधे घेऊन मनस्थिती ठीक करावी’
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली

