🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : ऍडलेड टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेणाऱ्या भारताला ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये जोरदार धक्का दिला. फक्त 36 रनवरच भारतीय टीम ऑल आऊट झाली. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे दिग्गज बॅट्समन असतानाही भारताची बॅटिंग गडगडली.
या इनिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. टेस्ट क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा सगळ्यात निच्चांकी स्कोअर आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 23 वेळा वेगवेगळ्या टीम 50 पेक्षा कमी धावसंख्येवर ऑल आऊट झाल्या आहेत.
भारताच्या लाजीरवाण्या कामगिरीचे सोशल मीडियावर सर्वच वाभाडे काढत आहेत, त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही उडी मारली . त्यानं केलेलं ट्विट तुफान व्हायरल होत आहे. त्यानं ट्विट केलं की, ‘मी उठलो तेव्हा मला स्कोअर ३६९ असा दिसला, त्यावर मला विश्वास बसला नाही. मी डोळे धुतले आणि पाहिलं तर काय, स्कोअर ३६/९ असा आहे. त्यावरही विश्वास न बसल्यानं मी पुन्हा झोपी गेलो.’
I woke up & saw the score 369. I couldn't believe it.
Then i washed my eyes and saw the score 36/9.
I couldn't believe it either & went back to sleep. ????????????
Video aa rahi hai.#INDvAUS #INDvsAUSTest— Shoaib Akhtar (@shoaib100mph) December 19, 2020
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- काश्मीरमध्ये एन्जॉय करतंय ‘हे’ नवविवाहित कपल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
