Share

‘आजचा दिवस पाहायला वडिल हवे होते’, क्रिकेटपटू सकारिया गहिवरला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.

श्रीलंका दौऱ्यातील बीसीसीआयने अनेक युवा खेळाडुंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली आहे. या दौऱ्यावर निवड झालेला चेतन सकारियाने ही बातमी कळताच वडिलांच्या आठवणीत भावुक झाला. मागील महिन्यात त्याच्या वडीलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. ‘आजचा दिवस बघायला वडील हवे होते. त्यांची खुप इच्छा होती की मी भारतासाठी खेळाव. आज भारतीय संघात निवड झाल्यावर मला त्यांची खुप आठवण येत आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली. मागील वर्षभरात चेतन सकारियाच्या आयुष्यात खुप चढ-उतार दाखवले. काही दिवसापुर्वी त्याच्या भावाचे निधन झाले होते. यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर त्याच्या वडीलांचे कोरोनामुळे निधन झाले होते.

विजय हजारे करंडक स्पर्धेत सौराष्ट्राकडुन पदार्पणातच त्याने 5 गडी बाद केले होते. यानंतर 2019 मध्ये त्याने सौराष्ट्राकडुन टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2021 आयपीएल लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने 1.2 कोटी इतकी रक्कम मोजुन विकत घेतले होते. आय़पीएल 2021 स्पर्धेत त्याने महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, के एल राहुल या सारख्या दिग्गज फलंदजांना बाद केले होते. महेंद्रसिंग धोनीला बाद करण्याचा क्षण चेतन सकारियासाठी सर्वात अविस्मरणीय होत असे त्याने सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!