पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विविध कार्यक्रमांसाठी आज पुणे दौऱ्यावर होते. यांनतर त्यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कथित नाराजी, ओबीसी आरक्षण, केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.
सत्ता हाती द्या, ओबीसी समाजाला चार महिन्यात आरक्षण न दिल्यास राजकारणातून संन्यास घेई असं विधान फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. याबाबत देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा जमा करणं हे चार महिन्याचं काम आहे, असं मी म्हणालो होतो. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं आरक्षण रद्द केलेलं नाही, आरक्षण त्याच ठिकाणी आहे. ज्या जाती आहेत त्या मागास नाहीत, हेही सांगितलेलं नाही,’ असं ते म्हणाले.
यासोबतच, ‘फक्त इम्पिरिकल चौकशी करण्यासाठी सांगितलं आहे आणि ही चौकशी ४ महिन्यात पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला द्या, आम्ही करतो. मी पुढील २५ वर्ष राजकारण करणार आहे, म्हणून मी एखादी गोष्ट बोलतो तर ती विचारपूर्वक बोलतो,’ असं देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सहकार खातं सुरु करण्यामागे त्यांचा हेतू काय?, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात’
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
- पंकजाताई म्हणाल्या भाजपला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही; तर फडणवीस म्हणाले…
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस


