टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. हा मेळावा शहरातील साधना मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंकजा मुंडेंनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी ‘परळी विधानसभेची निवडणूक मतदारसंघाच्या अस्तित्वाची व भवितव्य ठरविणारी आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्यासाठी महत्वाची आहेत, कार्यकर्त्यांनी सजग राहून काम करावे. बुथ यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी नियोजनबध्द रितीने पार पाडावी अशा सूचना केल्या.
पुढे बोलताना ‘मागील पंधरा वर्षे राष्ट्रवादीने सत्ता असूनही जिल्हयासाठी कांहीच केले नाही, विकासाची कोणतीही योजना आणली नाही, इथली जनता पारतंत्र्यात असल्यासारखी होती परंतु मी गेल्या पांच वर्षात परळी मतदारसंघ व बीड जिल्हयात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून जिल्हयाला ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले. माझ्या चांगल्या कामामुळे राष्ट्रवादीची बोगसगिरी देखील बंद झाली. चांगले नेतृत्व टिकले तरच त्या भागाचे भविष्य उज्वल असते, त्यामुळे चांगले काम करणा-या नेतृत्वाला जपा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सेलू अंबा येथील राजाभाऊ औताडे, घाटनांदूरचे प.स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, सायगावचे ग्रा.प.सदस्य रफीक कुरेशी, तसेच वाघाळा, पिंपळा धायगुडा येथील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलतांना औताडे यांनी पंकजा मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, अच्यूत गंगणे, शामराव आपेट, सुनील लोमटे, जीवनराव किर्दंत, गणेश कराड, कमलाकर कोपले, दिलीप काळे, अविनाश मोरे, संजय गिराम, विलास जगताप, नारायणराव केंद्रे, प्रदीप गंगणे, वैजनाथ आप्पा गारठे, बिभीषण गिते, अण्णासाहेब लोमटे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1179273327908720640?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1179267518910873602?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1179262906980012032?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

