Share

‘पुण्यातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असून मी स्वतः त्याचे नेतृत्व करणार’

Published On: 

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेते आणि व्यापारी यांनी केली आहे. दरम्यान, पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यवहार व दुकाने बंद ठेवून राज्य सरकार व प्रशासनाला सहकार्य केलं होतं. आता कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या कमी होऊन देखील निर्बंध का लागू ठेवले आहेत ? असा सवाल पुण्यातील व्यापारी महासंघाने केला आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांकडून विविध ठिकाणी येत्या ३ ऑगस्टला दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला आत भाजपने देखील पाठींबा जाहीर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परीषेदेत बोलताना म्हटले कि, ‘ भाजप पक्ष हा आंदोलनजीवी नाही. परंतु सध्याच्या पुण्यातील कडक निर्बंधामुळे व्यापारी वर्गाच मोठ्या प्रमाणवर नुकसान होत आहे. पुण्यातल्या व्यापाऱ्यांकडून सातत्याने वेळ वाढवण्याची मागणी होतानाचे चित्र आहे.

त्याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी वेळ वाढवण्याबाबत दोन दिवसाची मुदत पण दिली आहे. त्याची राज्य सरकारने दाखल घेतली नाही. तर व्यापारी बुधवारी घंटानाद आंदोलन करणार आहेत. माझा आणि पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा असून मी स्वतः त्याचे नेतृत्व करणार आहे.’ अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून सरकारनं ऐकलं नाही, तर बुधवारपासून दुपारी ४ नंतरही दुकानं सुरु ठेऊ, असा इशारा दिला आहे. यासोबतच, कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून व्यापाऱ्यांना जरी अटक केली, तरी आम्ही मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या फतेचंद रांका यांनी जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!