टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. भाजपने अभूतपूर्व यश मिळवत सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेसचे नेते राजीनामा देत आहेत.
शनिवारी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा सादर केला होता परंतु त्यांचा राजीनामा फेटाळला होता. अशातच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींकडे राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे राहुल गांधी चव्हाण यांच्या राजीनाम्यावर काय भूमिका घेतात हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.
राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांनी ‘मी राजीनामा सुपूर्द केला आहे आणि आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरवावं. पक्षातील पुनर्बांधणी आणि फेरबदल करण्याबाबत राहुल गांधी यांनीच ठरवावं. आम्ही त्यांना पूर्ण अधिकार दिले आहेत. लवकरच राहुल गांधी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करु’ असं विधान केले आहे.
Ashok Chavan,Maharashtra Congress Chief: I have submitted my resignation & now it's up to Congress President Rahul Gandhi to take call on whatever reshuffle & changes he wants to make. We fully authorise him to take call on this. I will be meeting Rahul Gandhi soon. (25.05.19) pic.twitter.com/4dzhH0QFd9
— ANI (@ANI) May 26, 2019
दरम्यान, या निवडणुकीत देशात काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या आहेत तर बहुतांशी राज्यात काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही. तसेच महाराष्ट्रात कॉंग्रेसला फक्त १ जागा मिळाली आहे.


