Share

आपण भाजपात जावं ही जनतेचीचं मागणी : वैभव पिचड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी भाजपात जाण्याची अधिकृत घोषणा केली.

अकोले येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना वैभव पिचड यांनी आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला. खांद्याला खांदा लावून काम केलं. मात्र मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच पिचड यांनी जाहीर केले.

तसेच लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला ३२ हजाराचं मताधिक्य दिलं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकास कामाला खिळ बसली. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे आपणच सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची मागणी आहे अस ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!