Share

‘पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर मी भाष्य करावे, त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत’, शरद पवारांकडून थेट पाणउतारा

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी चिंचवड : ठाकरे सरकार स्वतःच्याच ओझ्याने पडेल असा दावा भाजपाचे अनेक नेते करत असतात. या नेत्यांना माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ‘सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा’ असा सल्ला दिला होता. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर पवार म्हणाले की, ‘त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत’.

पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवार यांनी देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी भाजप सांगतं की महाविकास आघाडी सरकार पडेल. पण पंकजा मुंडे यांनी हे राजकारण बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षमपणे राबवावी असे भाष्य केलं. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देणे टाळल्याबाबत पवारांना विचारण्यात आले. त्यावेळी पवार म्हणाले की, ‘मला यावर भाष्य करायचं नाही. त्या काही एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत की त्यांनी काही सल्ला दिला त्याबद्दल मी काय सांगायचं. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचं धोरण कसं असावं याबद्दल त्यांनी सांगितलं असेल. त्यावर मला भाष्य करायचं कारण नाही’.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
सावरगाव येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर टीका करताना स्वपक्षीय नेत्यांनाही जोरदार टोले लगावले. ‘सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी भाजप नेत्यांना दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!