सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.
भाजपचे बडे नेते एकत्र आले असून हा कार्यक्रम जरी राजकीय नसला तरी राज्यातील राजकारणावर हे नेते काय भाष्य करणार याची उत्सुकता वाढली होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपपूर्वी फासे बदलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमित शाह राज्यात आल्याने ऑपरेशन लोटस चा मुहूर्त ठरणार का ? अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या.
या लोकापर्ण सोहळ्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचा उल्लेख महाराष्ट्रातील ‘दबंग नेते’ म्हणून ओळख असलेले नेते असा केला. यानंतर उपस्थितांनी देखील टाळ्यांचा प्रतिसाद दिला. ‘अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होता. 650 हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे, असं म्हणत फडणवीसांनी राणेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

