Share

‘नो बॉलवरच माझी विकेट गेली’ ; संजय राठोड यांनी व्यक्त केली खंत

Published On: 

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. सोशल मीडियात पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

तर पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळे समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही राठोड यांनी केला होता. विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान आता संजय राठोड यांनी एका कार्यक्रमात बोलताना नो बॉलवरच माझी विकेट गेली, अशी खंत व्यक्त केली. तसेच ते मीडिया ट्रायलचे शिकार झाले असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून वृत्तपत्राच्या छापील बातमीवर अजूनही जनसामान्यांचा विश्वास असल्यामुळे ही विश्वासार्हता टिकून राहायला हवी, ससे स्पष्ट त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

तर संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले होते कि, आता परत मला मंत्रीपद द्यायचे की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे, पण माझ्या समाजासाठी मी काम करत राहणार आहे. असे संजय राठोड म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!