Share

Assembly Session 2022 | “धनंजय मुंडेंचा सगळा प्रवास मला माहितीये, त्यामुळे…”; एकनाथ शिंदेंचा टोला

Published On: 

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. धनंजय मुंडे यांनी एकनाथ शिंदेंना ऐकनाथ होऊ नका, असा टोलाही लगावला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही धनंजय मुंडेंना सूचक इशारा दिलाय.

जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले, विरोधीपक्ष नेत्यांचा मान ठेवून बहुमताच्या जोरावर आम्ही कुठलंही काम करणार नाही. देवेंद्रजी आणि आम्ही दोघांनी ठरवलंय. काही लोकं तिकडे रोज बाहेर दोनच शब्द बोलतात, तिसरा मुद्दा आहे का? बिलकुल नाही, काय तर… ताट-वाटी, चलो गुवाहाटी, धनंजय मुंडे पण तिथे होते, एवढ्या जोरात बोलत होते, की ते किती वर्षांचे शिवसैनिक आहेत, असं बोलत होते बेंबीच्या देठापासून ओरडून, तुमचा घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले, आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहिती आहे, त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली ना? त्यामुळे थोडं. असं एकनाथ शिंदे म्हणतात विधिमंडळात हास्याचा गडगडाट झाला. शिंदेंच्या मागे बसलेले मंत्री संदिपान भुमरे हे अब्दुल सत्तार यांना गुद्दा घालत हसू लागले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!