पुणे: बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले होते. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत. यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. याप्रकरणावर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ मुख्य आरोपी म्हणून संजय राठोड यांचे नाव घेत आरोप करत आहेत.
संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत. मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय. अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत. तसेच राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान, आज भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देत पाहणी केली पूजाला श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण घटनेचा आढावा सांगत सत्ताधाऱ्यांवर आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
मंत्री महत्वाचा गरिबांच्या पोरी मेल्या तरी चालतील असा घणाघात यावेळी वाघ यांनी केला आहे. तर पोलीस कोणाच्या आदेशाची वाट बघत आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. तर संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच राज्यात नुकतेच लागू झालेल्या शक्ती कायद्यावर देखील त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला आहे. शक्ती कायदे मला बघावे लागतील, की, यामध्ये जे मंत्री कार्यकर्ते यांना सोडून इतरांवर गुन्हे दाखल करा असा तर आदेश नाही ना मंत्र्यांसाठी काही सुट आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. यामध्ये त्यांनी धनंजय मुंढे रेणू शर्मा प्रकरणावर देखील टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- संजय राठोड यांच्यामुळे शिवसेनेची कोंडी; मित्रपक्षांच्या नाराजीने उद्धव ठाकरेंवर वाढला दबाव
- औरंगाबाद मनपाच्या विरोधात व्यापाऱ्यांकडून बंदची हाक
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस जनतेला का माहिती देत नाहीत ?
- काँग्रेस नेते राहुल गांधींनी लुटला केरळमध्ये समुद्र सफारीचा आनंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
