Share

‘कठीण काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत हे पाहून मला आनंद होतो’

Published On: 

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्ती काही काळापासून सोशल मिडियापासून काही काळ दूर होती पण सध्या ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. बॉलीवूड मधील अनेक कलालकर या कोरोना काळात मदत करण्यास पुढे आले आहे. आता रिया चक्रवर्तीने देखील एक पोस्ट शेअर करत कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत लोकांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे.

रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या कठीण काळात एकमेकांच्या बाजूने उभ्या असलेल्या लोकांचे कौतुक केले आहे. तिने लिहिले की, ‘या कठीण काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत हे पाहून मला आनंद होतो. हे इतिहासात लिहिले जाईल. यावेळी एकमेकांना मदत करा, त्यांना चांगले वाटेल आणि एकमेकांचा तिरस्कार करु नका. एकमेकांचा द्वेष करु नका आणि एकत्र ही लढाई जिंकूया. जणू या जगात पुन्हा एकदा माणुसकीची सुरुवात होत आहे. विश्वास ठेवा.’

काही काळापूर्वी रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली होती ज्यात तिने लिहिले, ‘या कठीण काळात एकत्र राहणे महत्वाचे आहे. आपण जशी जमेल तशी सर्व मदत करा. मग ते छोटी असो किंवा मोठी. मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला मदत करू शकत असल्यास मला थेट मेसेज करा. मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. काळजी घ्या.’ असे म्हणत मदतीचा हात पुढे केला होता.

तसेच काही दिवसापूर्वीच तिने तिच्या काकांच्या मृत्यूबाबत भावुक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. ज्यात तिने त्यांना रियल लाईफ हिरो असं संबोधल होते. तसेच रियाने चाहत्यांना घरीच राहण्याचं आवाहन केले आणि सुरक्षित राहण्याचा हाच एक मार्ग आहे असेही सांगितले होते .

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!