Share

‘महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला पाहिजे असं मला एक टक्काही वाटत नाही तर…’, नितीन गडकरींचे स्पष्टीकरण

Published On: 

नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशाचे भावी पंतप्रधान व्हावे असे नेहमीच बोलले जाते. यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला पाहिजे असं मला एक टक्काही वाटत नाही. तर राज्याचा आणि देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, पंत, भाषा कुठलीही असली तर काही नाही. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे किंवा महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला पाहिजे, हे मला अमान्य आहे. या पदासाठी पात्र, योग्य असलेला व्यक्ती पंतप्रधान होईल.असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

दरम्यान नितीन गडकरी ‘एबीपी माझा’च्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी साधारण ५० कोटी खर्चून दिल्ली-मुंबई हायवेला वरळी सी लिंकपर्यंत जोडून समुद्रात उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी नितीन गडकरी यांनी अनेक पैलूंवर चर्चा केली. त्यांनी प्रत्येकाला आपल्या विचारांनुसार चालण्याचा अधिकार आहे. जनतेच्या न्यायालयात कुठला पक्ष विकासाभिमुख आहे, कोणतं नेतृत्व योग्य आहे हे ठरविण्याचा अधिकार त्यांचा आहे. मात्र आजकाल विरोधी पक्षात जातात तेव्हा लोक अस्वस्थ होतात. पण सत्तेत असल्यावर जबाबदारीने आणि विरोधात असल्यावर त्यापेक्षा चांगले काम करण्याचा निर्धार ठेवला तर लोकशाहीत गुणात्मक बदल होतील. अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!