Share

“मला मूर्ख म्हंटल्याचं काही वाटलं नाही पण…”, सदाभाऊंचे किशोरी पेडणेंकरांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यावरुन चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. ‘राज्यातील शाळा बंद आणि बार सुरु, महाविकास आघाडीला क्लास पेक्षा ग्लास महत्वाचा’, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊंवर निशाणा साधत ‘शाळा आणि बार याचं कॉम्बिनेशन करणे हे मुर्खाचं लक्षण आहे, सदाभाऊ यांच्या बुद्धीची किव येते’. अशी टीका केली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘आपण मला मूर्ख म्हटल्याचं नाही तर शालेय विद्यार्थांसाठी आपण काहीच केलं नाही याचंच वाईट वाटतं.’ असे ट्विट सदाभाऊंनी केले आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुळात सदाभाऊ खोत आणि माझी फारशी ओळख नाही. बार आणि शाळा यांचे काँबिनेशन करणं हेच किती मुखार्च लक्षण आहे. शाळा ही लहाण मुलं बाधित होताहेत लहाण मुलांकडं दुर्लक्ष करायचं, आणि राज्य चालवण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात, बारचं जे काही म्हणतात, जी राज्याची एसओपी तीच मुंबईची एसओपी आहे, शाळा आणि बार यांचं काँबिनेशन करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!