🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी कणकवली येथे दाखल झाली, यावेळी नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी लवकरच आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितले आहे.
दरम्यान, नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारल असता, आपण छोट्या विषयावर बोलत नाही, आम्हाला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. आज एकमेकांच्या राजकीय करीयरवर बोलायला लागल्यावर लोक आम्हाला वेडे समजतील. शिवसेना महाराष्ट्राचे स्वप्न बघत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
भाजपा-सेनेत काय होईल ? हे मला माहित नाही मात्र माझा भाजप प्रवेश निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीत नितेश राणे हे कमळाच्या चिन्हावर लढतील, असं नारायण राणे यांनी मंगळवारी सांगितले आहे. राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिल्यापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोलले जात होते. मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काय भूमीका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष
- आरे’तील वृक्षतोडी 30 सप्टेंबर पर्यंत होणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
- शिवसेनेचा विकासाला विरोध कधीही नव्हता;आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

