🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या वर्षीपासून राफेल विमान हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. मंगळवारी बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित असे राफेल फ्रान्स सरकारने भारताला सुपुर्द केले. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. मात्र, राफेलच्या या पूजनामुळे नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
‘मला जे योग्य वाटते तेच मी करतो. या विश्वात एक महाशक्ती आहे, अशी माझी श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणापासून या गोष्टींवर विश्वास आहे’, असे राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटले आहे.
फ्रान्स दौरा आणि राफेल विमान उड्डाणाचा अनुभवदेखील त्यांनी या वेळी कथन केला. सिंह म्हणाले, राफेल विमान प्रति तास 1800 किमी वेगाने उड्डाण करु शकते. मी या विमानातून १३०० किमी प्रति तास वेगाने उड्डाण केले. तसेच राफेल विमानाचा करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाला आहे.
राफेल मिळाल्याने वायुसेनेची क्षमता वाढली आहे. ना घाबरणार, ना घाबरवणार, पण आमची ताकद वाढवत राहणार. राफेल विमान हे कोणाला घाबरवण्यासाठी नाही. तर राफेल विमान फक्त वायुसेनेची ताकद वाढवण्यासाठी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182530785099673600?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182527087019610113?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
