टीम महाराष्ट्र देशा : “अभी तो मै जवान हू” असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या नेत्यांना चिमटा काढला आहे. शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. राज्यात विविध भागात ते प्रचारसभा घेत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार प्रचारसभेसाठी आज ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित सभेत पवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांनी पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर पवारांनी त्यांची फिरकी घेतली आहे. आज (ता. ९) वाडेगाव येथे आयोजित सभेत नेत्यांना उत्तर देताना ते म्हणाले. “अभी तो मै जवान हू”, ‘सर्वांना घरी पाठवूनच, मगच मी घरी जाणार’ माझ्या वयाबद्दल बोलू नका, मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, असं म्हणत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार राज्यभरात प्रचारसभा घेणार आहेत. यावेळी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी देखील शरद पवारांनी राज्यात दौरा केला होता. त्यावेळी या वयात देखील शरद पवार राज्यभर फिरत असल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1181879101470040065?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181892518859833345?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

