Share

खासदार या नात्याने हिंदूंच्या सुरक्षेची जबादारी माझीचं : इम्तियाज जलील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : हिंदू धोक्यात आहे, असे शिवसेना म्हणत आहे. भडकाऊ भाषणं करून फक्त लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. परंतु केवळ मुस्लिमचं नव्हे तर, हिंदू बंधु बगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. मी जिल्ह्याचा खासदार आहे या नात्यानं सर्वतोपरी जबाबदारी माझी आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले.

२३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. विजयी झाल्यानंतर इम्जियाज जलील यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी, औरंगाबादच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करेल. जिल्ह्यातील, शहरातील रस्त्यांचा प्रश्न सर्वात महत्वाच आहे. असे इम्तियाज जलील यांनी म्हंटले.

याचबरोबर, औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून मी विजयी झाल्याने शिवसेना म्हणत आहे हिंदू धोक्यात आहे. ते भडकाऊ भाषणे देत आहेत. भडकाऊ भाषण देत वातावरण  बिघडवत आहे . काही जन जातीय तेढ निर्माण करत आहेत. परंतु तसे काही नसून, केवळ मुस्लीमांचीच नाही तर हिंदू बंधू – बगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी पण माझी आहे. जिल्ह्याचा खासदार या नात्याने ती सर्वोतपरी जबाबदारी माझी आहे. असेही त्यांनी म्हंटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!