Share

‘अखेर ‘न्याय’ मिळाला, माझ्या देशात महिलांना न्याय मिळतो याचा मला अभिमान’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कारकांडातील चार आरोपींना तिहार कारागृहात आज पहाटे फासावर लटकवण्यात आले. गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला.

२० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धातास महत्त्वाचा होता, अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले.

याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या की, एक भारतीय महिला म्हणून मी आभार मानते, गेल्या साडेसात वर्षापासून निर्भयाचे आई-वडील हिंमतीने ही लढाई लढले,’ अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत होता. अखेर ‘न्याय’ मिळाला, माझ्या देशात महिलांना न्याय मिळतो याचा मला अभिमान आहे,’ अशा भावना त्यांनी याबाबत व्यक्त केल्या.

दरम्यान, देशभरात अशाप्रकारची जी प्रकरणं आहेत ती सगळी जलदगतीने ३ महिन्यात सोडवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. यातील आरोपींना फाशी देण्यात यावी ही अपेक्षा आहे,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!