🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी आज २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या खार परिसरातील घराबाहेर जाम ठोकला आहे.
पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या इमारतीकडे जाणारा रस्ता बॅरिकेटस लावून बंद केला होता. मात्र, शिवसैनिक या बॅरिकेटसवर चढले आणि राणा दाम्पत्याच्या घराच्या दिशेने चाल करून गेले आहेत. तर दुसरीकडे रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना पुढे करत आमच्या घराबाहेर शिवसैनिकांना पाठवले असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला आहे. त्यामुळे राज्याच्या सुख शांतीसाठी आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.
तर “हिंमत असेल तर खाली या”, असे खुले आव्हान शिवसैनिकांनी राणा दांपत्याला दिले आहे. शेकडोंच्या संख्येने राणा दांपत्याच्या घरासमोर शिवसैनिक जमले आहे. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येत आहे. आता घराबाहेर शिवसैनिकांनी जाम ठोकला असताना राणा दांपत्य बाहेर कसे पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “यांनी हनुमान चालीसा त्यांच्या अमरावतीच्या घरी जाऊन पठन करावी, असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन ड्रामा करू नये.”
महत्वाच्या बातम्या:
- “हिंमत असेल तर खाली या”, ‘हनुमान चालीसा’ वाद पेटला; राणांच्या इमारतीसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी
- “मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी…”, देवेंद्र फडणवीसांचा संताप
- भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; ‘मातोश्री’ समोर घडली घटना
- “साहित्यकांमध्ये चिअर लीडर्स तयार झालेत,” ; ज्ञानपीठ विजेते लेखक मावजो यांचे परखड मत
- नवाब मलिकांना मोठा धक्का, पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
