मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य या दोघांचं लग्न जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झाली. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच ही जोडी विभक्त झाली. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. आता समंथाने बाळाबद्दल तिचं मत सांगितलं आहे. तिला एका मुलाखतीत तिला अपत्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत”, असं समंथा म्हणाली आहे.
एका मुलाखती दरम्यान समंथाला अपत्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली. “हे खरं आहे आताच माझा घटस्फोट झालाय. पण माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत. वैयक्तिक कारणांमुळे माझा प्लॅन लांबणीवर पडला आहे. पण मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे”, असं समंथा म्हणाली आहे.
2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर समंथाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अक्किनेनी हे आडनावसुद्धा काढून टाकलं. नागा चैतन्यलाही अनफॉलोही केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
“…पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”, नाना पटोलेंचा इशारा
IPL 2022: सामना जिंकताच फाफचे मोठे वक्तव्य; म्हणाला ‘दिनेश कार्तिक धोनी सारखा…’
“भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान..” सलमान खानचे व्यक्तव्य चांगलेच चर्चेत
“शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह पण…”, UPA अध्यक्षपदाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
“नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही” – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

