🕒 1 min read
मुंबई : मी नवीन प्लेअर तरी सर्व बाऊन्सर टाकत आहेत. विधान परिषदेत विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे. जरा थांबा दमाने घ्या असे लोढा म्हणाले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. सलग दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.
मंगल प्रभात लोढा म्हणाले-
“सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यात मला ओपनिंगला उभं केलं आहे आणि माझ्यावर बाऊन्सर वर बाऊन्सर टाकले जात आहेत. आता तरी थांबा कारण त्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही”, असे लोढा म्हणाले. शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या चार मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मंगलप्रभात लोढा हे रिअल इस्टेटमधील मोठे नाव आहे. ते मुंबई भाजपचे अध्यक्षही आहेत. देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. फोर्ब्सच्या यादीतही त्यांचे नाव आहे.
44 हजार 270 कोटी रुपयांची संपत्ती-
मंगलप्रभात लोढा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 70 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. लोढा यांच्याकडे 44 हजार 270 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मंगलप्रभात लोढा, 66, मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. मूळचा राजस्थानमधील जोधपूरचे रहिवासी असलेला मंगलप्रभात मारवाडी समाजाचा मुख्य चेहरा मानला जातो. 1995 पासून ते सलग 6 वेळा आमदार राहिले असले तरी त्यांना कधीही मंत्रीपद मिळाले नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Vinayak Mete Accident । ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलतो; अजित पवारांनी मेटेंच्या अपघातावर उपस्थित केली शंका
- Arvind sawant | “ही हळद उतरली की तुमची नशाही उतरेल”; अरविंद सावंतांचा इशारा
- Assembly Session 2022 | “मागच्या वेळेस जे विचार मांडले त्यालाच आता विरोध का?”; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- Ajit Pawar | “मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा” ; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना प्रश्न
- BJP Leader | भाजप नेत्याला पत्नीने रंगेहात प्रेयसीसोबत पकडलं, भररस्त्यात नेत्याची पत्नीकडून चपलीने धुलाई, पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
