जळगाव : कोरोनाने पुन्हा एकदा राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अक्षरशः अव्वाच्या सव्वा भाव देऊन काळ्या बाजारातून खरेदी केलं जात आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले असून या इंजेक्शनमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या अनेक टोळ्यांना देखील पोलिसांनी गजाआड केलं आहे. दरम्यान, राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन वरून राजकारण तापल्याच पाहायला मिळत आहे.
रेमडेसिविरच्या साठेबाजीच्या संशयावरून ब्रुक कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली होती. यानंतर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी पार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु होत्या.
याप्रकरणी आता शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात भाष्य केलं आहे. ‘रेमडेसिविर इंजेक्शन्सची समस्या सध्या संपूर्ण राज्याला भेडसावत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यावरुन सुरु असलेल्या टीव्हीवरच्या बातम्या बघून आता मलाही कंटाळ आलाय.’ असं ते म्हणाले आहेत.
शिवाय, ‘जनतेचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन गरजेचे असताना विरोधी पक्षनेत्यांनी त्यासाठी पोलीस ठाण्यात जाणे, ही शरमेची बाब आहे. फडणवीसांनी तेथे न जाता रेमेडीसेवव्हीर राज्यातील जनतेला कसे मिळेल यासाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले असते तर त्यांचीही वाहवा झाली असती. त्यामुळे त्यांनी राजकारण न करता लॉकडाऊनच्या बैठकीवेळी जसं सहकार्य केलं तसेच रेमडेसिवीरच्या बाबतीत सहकार्य करावं’ असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व धार्मिक स्थळांच्या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करण्याची मागणी
- …म्हणून अजित पवार नाराज, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार भूमिका ?
- ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’मुळे जाग्या झाल्या ‘वॉटर एक्सप्रेस’च्या आठवणी
- देशात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना मिळणार लस
- नियमांना कोणी जुमानेना ! राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ नियम लागू होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

