टीम महाराष्ट्र देशा : ” राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल.” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे आपण वाट बघूया असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन होईल असं अनेकांना वाटलं नव्हतं. मात्र राज्यात भाजपने ज्या प्रकारे फोडाफोडीचं राजकारण केलं यामुळेच महाविकास आघडीचं सरकार अस्तित्वात आलं. उद्या होणाऱ्या मंत्रीमादल विस्तारात आमच्या पक्षाच्या वाट्याला ज्या 12 जागा आल्या आहेत. त्यात कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. आज-उद्यामध्ये संपेल आणि आपल्याला याबाबत सर्वांना कळेल असही चव्हाण म्हणाले.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत महाआघाडीच्या गोटात हालचालींना सुरवात झाली आहे. कोणाला कोणते खाते द्यायचे या बाबत चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसमधून कोणाला मंत्रिपद द्यायचे याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या तोला मोलाचे एकही खात सध्या रिकामे नसल्याने त्यांची वर्णी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी लागणार असल्याचं दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण होत आला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. खातेवाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात सामावून घेताना कोणतं खातं द्यायचं, असा पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1209106532580896769?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209109729709977600?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

