🕒 1 min read
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करुन काँग्रेस पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी असली तरी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. काँग्रेसकडून मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पदयात्रा आणि चौकसभा घेण्याचा प्लॅन आहे.
अशातच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. “आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आमची संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरु आहे.” अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.
“यावेळची मुंबई महानगपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे. आम्ही संघटनात्मक पातळीवर चर्चा करणार आहोत. २०२२ ची लोकसभा निवडणूक सध्या लांब आहे. मात्र, पक्षाचा विस्तार आणि स्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे नाना पटोले म्हणाले.
मुंबई महापालिकेत सध्या कॉंग्रेस विरोधी पक्षात आहेत. काँग्रेसचे रवि राजा विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. भाई जगताप यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केले होते.
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांचे सरकार आहे. त्यामुळे यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढवणार का ? हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.त्यामुळे एकंदरीतच यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार होईल यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या
- बायकोपासून कुटुंबीयांचा विरोध लपवणे ही फसवणूकच, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
- ‘पूजा चव्हाण यांच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी’
- एकच फाईट वातावरण टाईट… पडळकरांनी पवारांवर टीका केली आणि अवघी राष्ट्रवादी त्यांच्यावर तुटून पडली
- आदिवासी भिल्ल समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लावणार-संदिपान भुमरे
- भाजप नेत्यांच्या दौऱ्याला गैरहजर राहणारे संजयकाका जयंत पाटलांच्या शेजारी बसतात तेव्हा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
