🕒 1 min read
मुंबई : आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.
दरम्यान, ह्युंदाय मोटर्सने नवीन एसयूव्ही सादर करणार आहे. या नवीन क्रॉसओवर एसयूव्हीचे नाव बाय -ऑन’ असे ठेवले आहे. पण त्याचा उच्चार ‘बाय -ऑन’ असा केला जातो. हा शब्द फ्रेंच भाषेतील एका शब्दापासून प्रेरित आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, ही कार कदाचित सर्वात आधी युरोपियन बाजारात सादर केली जाईल. कार भारतीय बाजारात लाँच होईल की नाही, की केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच ही कार उपलब्ध असेल, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, या कारच्या फीचर्सबाबतची काही माहिती समोर आली आहे.
अलीकडेच कंपनीने स्पॅनिश भाषेपासून प्रेरणा घेऊन आपली 7-सीटर एसयूव्ही Alcazar आणण्याची घोषणा केली आहे. याबाबत कंपनीने सांगितले आहे की, ही त्यांची पहिली ‘मेड फर्स्ट फॉर इंडिया’ कार आहे आणि या कारचं ग्लोबल लाँचिंग भारतातूनच केलं जाणार आहे. त्यामुळे आता ‘बाय -ऑन’ भारतात लाँच केली जातेय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बाय -ऑन चा ग्राउंड क्लीयरन्स आय 20 पेक्षा जास्त आहे. तथापि, या कारचा व्हीलबेस 2,580 मिलीमीटर इतका आहे. या कारचा एक्सटीरियर लुक दमदार आहे. या कारचा एक्सटीरियर लुक ह्युंदायच्याच अपडेटेड कोना या कारप्रमाणे आहे. यामध्ये अॅरो-शेप्ड हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत मागच्या बाजूच्या लाईट्सही अशाच पद्धतीने डिझाईन करण्यात आल्या आहेत. या कारला क्रॉसओव्हर लुक देण्यासाठी कारच्या छताला टेपरिंग करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

