मुंबई : आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी भागातील स्थिती पाहता लाज वाटली पाहिजे असं म्हणताच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना विधानाचा नेमका अर्थ समजावून सांगत सरकारच्या कारभारावर टीका केली.
यानंतर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि लाज वाटली पाहिजे वाक्यावर संताप व्यक्त केला. “सदस्यांनी संसदीय शब्दांचा वापर करुन आपलं मत, भावना मांडता येतात. लाज वाटली पाहिजे म्हणजे काय? हे आकडे कुठले आहेत याची त्यांनी माहिती आहे. आपल्याच पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे असे शब्द ते कसे काय बोलू शकतात? हे आकडे तीन वर्षांचे आहेत, आपले वडील मुख्यमंत्री होते.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?- राज ठाकरे
- Jayant Patil। जयंत पाटलांकडून सभागृहात तुफान टोलेबाजी, शिंदे गटातील मंत्रिपदावरुन ओढले ताशेरे
- Aditya Thackrey | आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ वाक्यावरुन विधान भवनात उडाला गोंधळ
- Nitin Gadkari | नितीन गडकरींची अफवा पसरवणाऱ्यांवर सडकून टीका, VIDEO शेअर करत सांगितले सत्य
- Aditya Thackeray | आदिवासी समाजाला न्याय द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

