Share

हृतिक रोशन करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट! घरच्यांनी पकडले …

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन सबा आझादला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. विशेष म्हणजे हृतिकच्या कुटुंबालाही सबा आझाद खूप आवडते . गेल्या काही दिवसांपासून सबा आझाद आणि हृतिक रोशन यांच्या कुटुंबातील जवळीकही पाहायला मिळत आहे. सबा आझाद आजारी पडल्यावर अभिनेत्याच्या कुटुंबानेच सबाची काळजी घेतली. त्याच वेळी, आता सबा आझादने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मीनाने एक सुंदर कमेंट केली आहे. या कमेंटवरून स्पष्ट होत आहे की तिला सबाचा फोटो खूप आवडला आहे.

सबा ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती आणि अभिनेत्रीने त्याच वेब सीरिजमधील तिच्या लूकचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती पीच कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात मोत्यांची माळ आणि तिच्या केसांची एक छोटी क्लिप सबाला छान दिसत होती . सबाने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मिस. परवाना इराणी. सिरसा 1942. सबाच्या या फोटोवर हृतिकची चुलत बहीण पश्मीना हिने कमेंट केली आहे.
हृतिक रोशनची बहीण आणि राजेश रोशनची मुलगी पश्मिना रोशनने सबाच्या या फोटोवर एक सुंदर टिप्पणी केली आहे. पश्मिनाने लिहिले, ‘उफ.’ यासोबतच पश्मिनाने हृदयाचा एक इमोजीही पोस्ट केला आहे. पश्मिनाच्या या कमेंटवर सबानेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने किसिंग फेस इमोजी पोस्ट केला आहे. हृतिकची बहीण सुनैना रोशनच्या मुलीनेही सबाच्या या फोटोवर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलंय, ‘स्टॉप इट.’ या कमेंट्सवरून साबा आझाद हृतिकच्या कुटुंबात मिसळल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!