Share

‘आरोपी मेहबूब शेखला अटक न करता औरंगाबाद पोलीस कसा तपास करणारेत?’

Published On: 

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना न्यायालयाने नुकताच दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या मुद्द्यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. ‘आरोपी मेहबूब शेखला अटक न करता औरंगाबाद शहर पोलीस कसा तपास करणारेत?’ असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे.

मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच बलात्काप्रकरणी शेख अडचणीत आलेले आहेत. सध्या या प्रकरणावर औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले. न्यायालयाने मेहबुब शेख यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट रद्द केला आहे. तसेच या बलात्कार प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास कारा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरून चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

काय आहे प्रकरण
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. पण तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आरोप मेहबूब शेख यांनी समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले होते.

पोलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आरोपी यांची भेट झाल्यावरही शंका उपस्थित केली होती. सीसीटीव्हीतही दोघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. त्यावरून पोलिसांकडून बी समरी अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून फेटाळला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!