मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद आहेत. वादाचे रूपांतर वादळात होईल अशी रिपरिप गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. पण शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?’ असं म्हणत शिवसेनेनं भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात ‘अंतर्विरोधाच्या चिपळ्या!’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात भाजपवर सडकडून टीका करण्यात आली.
संजय राऊत यांच्या याच अग्रलेखावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सडकून टीका करत महाविकास आघाडीच्या कृबुरीवर जोरदार घन्घात केला आहे. ‘अंतर्विरोध, अंतरपाट नाही आम्ही वरमाला घातल्या आहेत… पाच वर्ष राज्य सरकार टिकण्याचा संजय राऊत यांना विश्वास, हनिमूनच्या काळातच ज्यांची खाट कुरकुरायला लागली त्यांचा संसार किती टिकणार? बदल्यांच्या प्रकरणावरून झालेला तमाशा ताजा आहे’. अशी सणसणीत चपराक अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीला लगावली आहे.
अंतर्विरोध, अंतरपाट नाही आम्ही वरमाला घातल्या आहेत… पाच वर्ष राज्य सरकार टिकण्याचा संजय राऊत यांना विश्वास…
हनिमूनच्या काळातच ज्यांची खाट कुरकुरायला लागली त्यांचा संसार किती टिकणार? बदल्यांच्या प्रकरणावरून झालेला तमाशा ताजा आहे. pic.twitter.com/QyBDtWo8LY— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 8, 2020
आता या टीकेला देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीनं ५ वर्ष जरुर सरकार चालवावं त्यांना शुभेच्छा आहेत. पण सामना एवढा अंतर्विरोध कुठेच झाला नाही, रोज आपली भूमिका बदलतात असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
याबाबत टीव्ही ९ शी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामनानं कधी पवारांविरोधात लिहिलं कधी बाजूने लिहिलं, राज्यपालांविरोधात लिहिलं परत बाजूने लिहिलं, सातत्याने भूमिका बदलत असतात. सामनाला स्वत:चा बेस नाही, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातल्या ‘सामना’ची आज काय अवस्था झाली आहे. भूमिका नसणारा सामना, लांगूनचालन करणारा सामना, त्यावर काय प्रतिक्रिया देणार? त्यांना काय लिहियाचं ते त्यांचे त्यांना लखलाभ आहे असा टोला शिवसेनेला लगावला.
तसेच आम्ही सरकार पाडण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. सरकार पाडण्याची घाई नाही असं वारंवार आम्ही सांगतोय पण चोराच्या मनात चांदणे, म्हणून त्यांना रोज सरकार पडणार नाही असं सांगावे लागत आहे. त्यांच्या अंतर्विरोधामुळे हे सरकार एकरुप नाही असं समाज मनाची अवस्था आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
नाटकांचे आता होणार ऑनलाइन प्रयोग
शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू
कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या, राजीव गांधी फाऊंडेशनच्या चौकशीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

